Ticker

50/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

"चेक बाउन्स होणे" म्हणजे काय?

चेक बाउन्स होणे म्हणजे बँकेत दिलेला चेक काही कारणांमुळे पास न होणे आणि पैसे न मिळणे. म्हणजेच चेक परत येतो.
चेक बाउन्स होणे म्हणजे बँकेत दिलेला चेक काही कारणांमुळे पास न होणे आणि पैसे न मिळणे. म्हणजेच चेक परत येतो.

1 चेक बाउन्स होण्याची मुख्य कारणे

बँक खात्यात पुरेसे पैसे नसणे
चेक दिलेल्या व्यक्तीच्या खात्यात रक्कम कमी असेल तर चेक बाउन्स होतो.

2 सिग्नेचर जुळत नसणे

चेकवरील सही बँकेतील रेकॉर्डशी जुळली नाही तर.

3 चेकवरील माहिती चुकीची असणे

तारीख, रक्कम किंवा नाव चुकीचे लिहिलेले असल्यास.

4 चेकची मुदत संपणे

साधारणतः चेक 3 महिन्यांपर्यंत वैध असतो.


5 खाते बंद असणे.

कायदेशीर बाब
भारतामध्ये चेक बाउन्स हा Negotiable Instruments Act, 1881 च्या कलम 138 अंतर्गत गुन्हा मानला जातो.

प्रक्रिया थोडक्यातः

1 चेक बाउन्स झाल्यावर बँक Cheque Return Memo देते.
2 चेक घेणाऱ्या व्यक्तीने 30 दिवसांच्या आत नोटीस पाठवावी.
3 नोटीस मिळाल्यानंतर 15 दिवसांत पैसे दिले नाहीत तर कोर्टात केस करता येते.


चेक बाऊन्स झाल्यास शिक्षा काय होऊ शकते ?

1) 2 वर्षापर्यंत तुरुंगवास
2) किंवा दुप्पट रकमेपर्यंत दंड
किंवा दोन्ही


चेक किती दिवस वैध असतो ?
भारतामध्ये चेकची वैधता साधारण 3 महिने असते.
उदा. चेकवर 1 जानेवारी तारीख असेल तर तो 31 मार्चपर्यंत बँकेत जमा करता येतो.


चेक बाउन्स झाला तरी नेहमी गुन्हा होत नाही
प्रत्येक चेक बाउन्स केस गुन्हा नसतो.


खालील कारणांसाठी बाउन्स झाला तर सहसा गुन्हा लागू होत नाही.

1 Signature mismatch
2 Overwriting/writing mistake
3 Cheque damaged
4 Account closed


पण खात्यात पैसे नसणे (Insufficient Funds) किंवा Payment stopped by drawer अशा कारणांमुळे बाउन्स झाला तर केस होऊ शकते.


चेक बाउन्स केस कुठे दाखल होते ?
केस साधारण त्या ठिकाणी दाखल होते जिथे चेक जमा केला होता त्या बँकेचे क्षेत्राधिकार (Jurisdiction) असते.


काही लोक "सिक्युरिटी चेक" देतात
कधी कधी व्यवहारात Security Cheque दिला जातो.
तो बाउन्स झाला तरी परिस्थितीनुसार कोर्ट केस होऊ शकते.


महत्वाची गोष्ट (लोकांना कमी माहिती असते)
जर चेक देणाऱ्या व्यक्तीने नोटीस मिळाल्यानंतर 15 दिवसांत पूर्ण पैसे दिले, तर फौजदारी केस टाळता येते.

उदाहरणे.:- 
उधारीचे पैसे देताना चेक दिला

उदाहरण:
रमेशने सुरेश कडून ₹50,000 उधार घेतले. पैसे परत देण्यासाठी रमेशने सुरेशला ₹50,000 चा चेक दिला.
सुरेशने तो चेक बँकेत जमा केला, पण रमेशच्या खात्यात फक्त ₹5,000 होते.
त्यामुळे बँकेने चेक "Insufficient Funds" म्हणून परत पाठवला.
यालाच चेक बाउन्स म्हणतात आणि यावर Negotiable Instruments Act, 1881 च्या Section 138 अंतर्गत केस होऊ शकते.


2 दुकानातून माल घेताना दिलेला चेक
उदाहरण:
एका व्यापाऱ्याने होलसेल दुकानातून ₹2 लाखांचा माल घेतला आणि त्यासाठी चेक दिला.
दुकानदाराने चेक जमा केला, पण बँकेने Account Closed किंवा Funds Insufficient म्हणून चेक परत केला.
दुकानदार कोर्टात चेक बाउन्स केस दाखल करू शकतो.


बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव यांच्यावर 2018 मध्ये चेक बाउन्स प्रकरणात कोर्टाने शिक्षा सुनावली होती.
प्रकरण काय होते ?
त्यांनी एका कंपनीकडून चित्रपटासाठी सुमारे ₹5 कोटी कर्ज घेतले होते.
'ते पैसे परत करण्यासाठी दिलेले चेक बाउन्स झाले.
'त्यामुळे दिल्ली कोर्टात केस झाली.
हा केस Negotiable Instruments Act, 1881 च्या Section 138 अंतर्गत होता आणि त्यांना काही काळ जेल देखील जावे लागले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या