मासिक सभेचे नियम
१) नियम ३ पोटनियम १ नुसार
ग्रामपंचायतीची दरमहा एक सभा घेण्यात आलीच पाहिजे आणि सभेच्या अखेरीस अध्यक्षांनी
सदस्यांशी चर्चा करून पुढील सभेची तारीख ठरवली पाहिजे.
२) नियम
५ पोटनियम १ नुसार, दरमहा होणाऱ्या सभेव्येतिरिक्त जास्तीची खास सभा घ्यायची
आवश्यकता असल्यास सरपंच किंवा त्यांचा अनुपस्थितित उपसरपंचान तसी सभा भरविण्याचा
पूर्ण अधिकार आहे.
३) ग्रामपंचायतीच्या निम्म्यापेक्षा अधिक सदस्यांनी
लेखी मागणी केल्यावर खास सभा भरविता येते अशी लेखी मागणी केल्यापासून आठ
दिवसांच्या आत अशी खास सभा सरपंचाला बोलवावी लागते.
४) पंचायत
समिती,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेची
स्थायी समितीने विशेष आदेश देउन सभेची मागणी केल्यास खास सभा भरविण्यात येते आणि
अशी खास सभा आदेश आल्यापासून आठ दिवसांच्या आत बोलावली पाहिजे.
५) नियम
5 च्या पोटनियम 2 नूसार, खास सभा बोलावण्याच्या किमान
एक दिवस अगोदर अशा खास सभेची तारीख, वेळ व ठिकाण याबाबतची
माहिती सचिवांनी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना कळविली पाहिजे.
६) नियम
6 च्या पोटनियम 2 नुसार, कोणतीही ग्रामपंचायतीची सभा
ग्रामपंचाय तीच्या कार्यालयात, चावडीवर किंवा सार्व जनिक
ठिकाणीच घेतली पाहिजे कोणत्याही खाजगी ठिकाणी अशी सभा घेता येत नाही.
७) ग्रामपंचायतीच्या
सभेची सुचना नियम 6 च्या पोटनियम 1 नुसार ग्रामपंचाय तीच्या सदस्यांना लेखी नोटीस
पाठवली पाहिजे ग्रामपंचायतीच्या सभेची तारीख, वेळ आणि
ठिकाण सुचनाफलकावर लावली पाहिजे सभे संदर्भातील माहिती आदल्या दिवशी दवंडी पिटवून
सुध्दा दिली पाहिजे.
८) ग्रामपंचायतीच्या
साधारण सभेची सुचना काढणे आवश्यक असते सभेची नोटीस प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याला
मिळणे आवश्यक असते त्यामुळे या नियमानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सभेची नोटीस
ठरलेल्या तारखेच्या तीन दिवस आधी दिली गेली पाहिजे.{ सभेची
नोटीस व अजेंडा ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीचा सचिव या नात्याने काढत असतो सभेच्या
सूचनेत सभेची तारीख,वेळ आणि ठिकाण याबाबत सविस्तर माहिती
दिली पाहिजे आणि त्या सुचनेबरोबरच सभेत कोणते कामकाज चालविण्यात येणार आहे त्याची
सुध्दा माहिती दिली गेली पाहिजे.
९) ग्रामपंचायतीच्या
सभेचा अध्यक्ष नियम 8 च्या पोटनियम 1 नूसार ग्रामपंचाय तीच्या सभेचा अध्यक्ष सरपंच
हे असतात मात्र सरपंच गैरहजर असल्यास अशा सभेचे अध्यक्षपद उपसरपंच भुषवितात, जर सरपंच व उपसरपंच हे दोघेही सभेला गैरहजर असल्यास प्रथम सभेला हजर
असलेल्या सदस्यांमधून एका सदस्याची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते अशा
अध्यक्षाच्या माध्यमा तून सभा चालवली जाते मात्र सभा सुरू अस तांना जर सरपंच किंवा
उपसरपंच आल्यास सर्व सूत्रे त्यांच्याकडे द्यावी लागतात.
१०) नियम
9 च्या पोटनियम 1 नुसार ग्रामपंचाय तीच्या सभेचे कामकाज चालविण्यासाठी सदस्यांच्या
किमान उपस्थितीची आवश्यकता असते यालाच आपण ' गणपुर्ती'
किंवा 'कोरम' म्हणतो सभा
चालविण्यासाठी ही गणपूर्ती सरपंच व उपसरपंच धरून ग्राम पंचायत सदस्यांच्या एकूण
संख्येच्या एक व्दितीयांशपेक्षा अधिक म्हणजे निम्मे किंवा निम्म्यापेक्षा जास्त
इतके सदस्य उपस्थित असले पाहिजे.
११) नियम
9 च्या पोटनियम 2 नूसार सभेची गणपूर्ती नसल्यास अध्यक्ष 15 मिनाटांहून कमी नाही व
30 मिनटांपेक्षा जास्त नाही इतकी वेळ वाट पाहिल्या नंतर सभा तहकूब करावी लागते, सभेसाठी नेमलेल्या वेळेपासून तीस मिनिटांच्या आत गणपुर्ती झाली पाहिजे सभा
सुरू झाल्यापासून 30 मिनिटांच्या आत गणपुर्ती झाली तर सभा सुरू होते जर गणपुर्ती
झाली नाही तर सभा बरखास्त करण्यात येते आणि गणपुर्ती अभावी जर सभा तहकूब झाली असेल
आणि तहकुब सभेतील अनिर्णित कामकाज पुढच्या सभेत गणपुर्ती असो किंवा नसो ते निकालात
काढले पाहिजे.
१२) मुंबई
ग्रामपंचायत सभांबाबत नियम म्हणजे 11 सदस्य असणाऱ्या ग्रामपंचातीत सभा सुरू
होण्यासाठी सदस्यां ची उपस्थिती आवश्यक असते.नियम 13 नूसार एकदा पास झालेला ठराव
पंचायतीच्या सदस्यांच्या एकूण दोन तृतीयांशापेक्षा कमी नाहीत इतक्या सदस्यांनी तसा
ठराव संमत केल्याशिवाय पंचायतीच्या कोणत्याही ठरावात तो ठराव संमत झाल्या च्या
तारखेपासून तीन महिन्याच्या आत कोण तीही दुरुस्ती किंवा रद्द करता येत नाही.


0 टिप्पण्या