ग्रामसेवकाची तक्रार कशी करायची ?
ग्रामसेवकावर तक्रार कधी करता येते?
- कार्यालयीन कामात उशीर किंवा हलगर्जीपणा केल्यास.
- ग्रामपंचायत निधीच्या वापरात गैरव्यवहार किंवा अपहार असल्यास.
- सरकारी योजना गावात न राबवल्यास किंवा माहिती लपवल्यास.
- ग्रामस्थांसोबत गैरवर्तन, बदमाशी किंवा भ्रष्टाचार केल्यास.
- मनमानी वर्तन केल्यास किंवा शासन नियम मोडल्यास.
तक्रारीचे प्रकार
कोठे करायची तक्रार ?
1 साधी तक्रार (वागणूक, अनुपस्थिती)सरपंच, गटविकास
अधिकारी (BDO)
2 आर्थिक गैरव्यवहार
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी
किंवा लोकायुक्त
अत्यंत गंभीर तक्रार (भ्रष्टाचार)
लोकायुक्त/उप-लोकायुक्त कार्यालयात
4 शिस्तभंग प्रकरण
पंचायत समितीमार्फत चौकशी प्रक्रिया सुरू होते
5 इतर पर्याय
महाराष्ट्र शासनाच्या 'Aaple Sarkar' किंवा 'RTS' पोर्टलवर ऑनलाईन तक्रार दाखल करता येते.
ग्रामसेवकाचा गैरवर्तनाचा प्रकार माहिती अधिकार कायद्याखाली (RTI) मागून तपासता येतो.
तक्रारीचा नमुना
तारीखः / /2025
प्रति,
प्रति,
सन्माननीय सरपंच महोदय/गटविकास अधिकारी/मुख्य कार्यकारी अधिकारी,
[ग्रामपंचायतचे नाव],
[तालुका], [जिल्हा].
विषयः ग्रामसेवकाच्या गैरकारभाराबाबत तक्रार.
महोदय,
मी [तुमचे पूर्ण नाव], राहणार [पत्ता] ग्रामपंचायत [गावाचे नाव] याचा निवासी आहे. आमच्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक [ग्रामसेवकाचे नाव] यांच्याविषयी खालीलप्रमाणे
तक्रार आहे:
[येथे तुमची तक्रार सविस्तर लिहा, उदाहरणार्थ:] ग्रामसेवक शासकीय कामात हलगर्जीपणा करत आहेत.
1. नियमितपणे कार्यालयीन उपस्थिती नसते.
2. योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली जात नाही.
3. शासकीय कामासाठी पैशाची मागणी होते.
4. रेशन वाटप/शासकीय योजनेत अपहार व अपारदर्शकता आहे.
अशा प्रकारामुळे गावकऱ्यांचे नुकसान होत असून ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तरी, आपल्या स्तरावरून योग्य ती चौकशी करून संबंधित ग्रामसेवकावर शिस्तभंगात्मक किंवा कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी नम्र विनंती करतो. आपण तातडीने या तक्रारीची दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी ही अपेक्षा.
आपला नम्र,
[तुमचे पूर्ण नाव]
[मोबाईल नंबर]
[स्वाक्षरी]
तक्रार झाल्यावर काय होते?
- प्राथमिक चौकशी केली जाते.
- चौकशीसाठी ग्रामसेवकाला नोटीस पाठवली जाते.
- पुरावे आणि साक्षीदार तपासले जातात.
- दोषी आढळल्यास -
- कारण विचारणा केली जाते.
- शिस्तभंगाची कारवाई (उदा. निलंबन, बदली, सेवेतून बडतर्फ) केली जाऊ शकते.
- मोठ्या आर्थिक गैरव्यवहारात एफआयआर दाखल होऊ शकतो.
तक्रार करताना काही काळजी घ्यावी
- तक्रार लेखी आणि पुराव्यानिशी असावी.
- शक्य असल्यास साक्षीदारांची नावे व फोन नंबर जोडावेत.
- स्वतःची तक्रार नोंदवल्यावर तपास क्रमांक/पावती मागावी.
- वेळोवेळी फॉलोअप घ्यावा.
महत्त्वाचे कायदे आणि मार्गदर्शक तत्वे
1 महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ (GPM Act).
2 शासनाचे विविध आदेश (G.R.) ग्रामसेवकाच्या कामकाजावर लागू आहेत.
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ (PC Act) जर भ्रष्टाचाराचा आरोप असेल तर लागू होतो.

0 टिप्पण्या