Ticker

50/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

नगरपंचायत म्हणजे काय?

नगरपंचायत ही एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जी लहान शहरांमध्ये किंवा वाढत्या गावांमध्ये (transition area) कार्य करते. जिथे लोकसंख्या साधारणतः १५,००० ते २५,००० च्या दरम्यान असते, तिथे ग्रामपंचायतीऐवजी नगरपंचायत स्थापन होते.

  •  नगरपंचायत ही एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जी लहान शहरांमध्ये किंवा वाढत्या गावांमध्ये (transition area) कार्य करते.
  • जिथे लोकसंख्या साधारणतः १५,००० ते २५,००० च्या दरम्यान असते, तिथे ग्रामपंचायतीऐवजी नगरपंचायत स्थापन होते.

नगरपंचायतीची गरज का?

  • गाव मोठं होत असतं,
  • लोकसंख्या वाढत असते,
  • शहरी सुविधांची गरज वाढते
  • त्यामुळे तेथे ग्रामपंचायतीचे अधिकार कमी पडतात. अशा ठिकाणी "नगरपंचायत" स्थापन केली जाते.

मुख्य कामं (कार्यभार)

  1. पाणी पुरवठा करणे
  2. रस्ते बांधणे व देखभाल
  3. स्वच्छता व कचरा व्यवस्थापन
  4. सार्वजनिक रोषणाई (स्ट्रीट लाईट्स)
  5. आरोग्य सेवा (फवारणी, नाल्यांची सफाई)
  6. स्थानिक कर वसूल करणे
  7. जन्म / मृत्यू प्रमाणपत्रे देणे
  8. शहराचा विकास आराखडा तयार करणे

नगरपंचायतीची रचना

  • नगराध्यक्ष (Chairperson / President)
  • उपनगराध्यक्ष
  • नगरसेवक (Council Members)
  • प्रशासनिक अधिकारी (मुख्याधिकारी)

नगरपंचायत कोणत्या कायद्याअंतर्गत येते?

  • महाराष्ट्रात महाराष्ट्र नगरपंचायत अधिनियम, 1965 अंतर्गत नगरपंचायत स्थापन केली जाते.
  • याशिवाय ७४ वा घटनादुरुस्ती अधिनियम, १९९२ (74th Constitutional Amendment) नुसार देशभरात नगरपालिकांचे अधिकार निश्चित झाले.

नगरपंचायत कधी तयार होते ?

  • ज्या गावांची लोकसंख्या १५,००० पेक्षा जास्त आणि २५,०००-३०,००० पेक्षा कमी असते आणि जिथे नागरीकरण होऊ लागले आहे तिथे नगरपंचायत तयार होते.
  • जिल्हाधिकारी / राज्य सरकार या भागाला "नगरपंचायत" घोषित करतात.

नगरपंचायतीत सदस्य कसे निवडले जातात ?

  • प्रत्येक प्रभागासाठी एक नगरसेवक (Councillor) निवडला जातो.
  • ही निवडणूक दर ५ वर्षानी होते.
  • नगराध्यक्ष (President) हा थेट जनतेतून किंवा निवडून आलेल्या सदस्यांतून निवडला जातो (राज्यानुसार फरक असतो).

नगरपंचायतीला निधी कुठून मिळतो?

1. स्थानिक कर व शुल्क
  • घरपट्टी (Property Tax)
  • पाणीपट्टी
  • लायसन्स फी
  • व्यापारी कर

2.  राज्य सरकार व केंद्र सरकारकडून
  • १५ वा वित्त आयोग निधी
  • विशेष योजना (Amrut, Swachh Bharat, PMAY)

नगरपंचायतीत लोकांचा सहभाग कसा असतो ?

  • नागरिकांना RTI चा वापर करून माहिती मिळवता येते.
  • ठराव, निधी, कामांची माहिती सार्वजनिक असते.
  • नगरपंचायतीच्या बैठकीसाठी सामान्य नागरिकांना उपस्थित राहण्याचा हक्क असतो.
  • तक्रार नोंदवू शकतात.
  • स्थानिक निवडणूकांमध्ये मत देता येते.

सामान्य तक्रारी / समस्या

  • निधीचा अपुरा वापर.
  • निकृष्ट दर्जाचे काम.
  • काम आदेश नसताना काम.
  • कर न वाढवता सेवा सुधारण्यात अडथळा.
  • नागरिकांची माहिती नसणे.


नगरपंचायतीचा कार्यकाल

  • ५ वर्षांचा कार्यकाल असतो.
  • निवडणुका राज्य निवडणूक आयोग (State Election Commission) घेतो.

नगरपंचायतीत कोणकोणते अधिकारी असतात ?

निवडून आलेले लोकप्रतिनिधी
  1. नगराध्यक्ष (President)
  2. उपनगराध्यक्ष
  3. नगरसेवक


प्रशासनिक अधिकारी
  1. मुख्याधिकारी (Chief Officer)
  2. कनिष्ठ अभियंता (JE)
  3. आरोग्य निरीक्षक
  4. कर वसूल करणारे कर्मचारी

नगरपंचायतीच्या बैठका कशा घेतल्या जातात ?

  • दर महिन्याला कमीत कमी १ बैठक घेणे बंधनकारक आहे.
  • बैठकांमध्ये ठराव मंजूर होतात (Resolution).
  • बैठकीचे अधिवेशन (Proceedings) तयार होते.
  • नागरिकांना ही बैठक बघण्याचा अधिकार आहे (Open to public).
निधीचा उपयोग कसा ठरतो ?
  • नगरपंचायतीकडे जेवढा निधी उपलब्ध असतो तो प्राथमिक गरजा /ठरावांनुसार वापरला जातो.
        उदा: 
  •  ५०% - रस्ते, पाणी, स्वच्छता
  • ३०% - शहरी गरीबांसाठी योजना
  • उरलेला - स्ट्रीट लाइट, सार्वजनिक उद्याने इ.

नागरी समस्यांवर त्वरित उपाय

  1. नगरसेवकांशी संपर्क साधणे.
  2. प्रशासकीय अधिकाऱ्यांना अर्ज देणे.
  3. ऑनलाईन पोर्टल (काही नगरपंचायतींनी).
  4. लोकप्रतिनिधींकडे Follow-up.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या