Ticker

50/recent/ticker-posts

RFO म्हणजे कोण?

RFO - Range Forest Officer मराठीत यांना वनपरिक्षेत्र अधिकारी असे म्हणतात.
RFO - Range Forest Officer
मराठीत यांना वनपरिक्षेत्र अधिकारी असे म्हणतात.


RFO कोणत्या विभागात काम करतो?
  • वन विभाग (Forest Department)
  • पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय (राज्य स्तरावर - महाराष्ट्र शासन)


RFO चे मुख्य काम काय असते ?
  • वन क्षेत्राचे संरक्षण करणे
  • बेकायदेशीर वृक्षतोड थांबवणे.
  • वन्यजीव संरक्षण व शिकारीवर नियंत्रण.
  • जंगलातील आग (Forest Fire) रोखणे.
  • वन कायद्यांची अंमलबजावणी.
  • गावकरी व वनहक्क धारकांशी समन्वय.
  • वनरक्षक (Forest Guard) व इतर कर्मचाऱ्यांवर नियंत्रण.


RFO ची पोस्टिंग कुठे असते ?
  • Forest Range (वनपरिक्षेत्र).
  • प्रत्येक जिल्ह्यात अनेक Forest Ranges असतात.


RFO कसा बनता येते?
MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) मार्फत परीक्षा.


परीक्षा नाव: RFO / State Forest Service परीक्षा



शैक्षणिक पात्रता (थोडक्यात)
  • विज्ञान शाखेतील पदवी (Agriculture / Forestry / Botany/
  • Zoology/Engineering इ.)
  • शारीरिक क्षमता व मैदानी चाचणी आवश्यक.


RFO चा दर्जा (Rank)
Class-II Gazetted Officer.



RFO चा वरिष्ठ अधिकारी कोण?
  • ACF - Assistant Conservator of Forests
  • DCF - Deputy Conservator of Forests


RFO कडे कोणते अधिकार असतात ?
  • वन गुन्ह्यांमध्ये आरोपीला ताब्यात घेण्याचा अधिकार.
  • बेकायदेशीर लाकूड, वाहने, साहित्य जप्त करण्याचा अधिकार.
  • Forest Act, Wildlife Act अंतर्गत गुन्हे नोंदवणे.
  • जंगलात तपास व पंचनामा करण्याचा अधिकार.


RFO = पोलीस अधिकार ?
  • होय, वन गुन्ह्यांच्या बाबतीत RFO ला पोलीससारखे अधिकार असतात. पण हे अधिकार फक्त वन क्षेत्र व वन कायद्यांपुरते मर्यादित असतात.


RFO आणि वन्यजीव संरक्षण
  • व्याघ्र प्रकल्प (Tiger Reserve) मध्ये महत्त्वाची भूमिका.
  • वन्यप्राण्यांचा मृत्यू / हल्ला तपास.
  • मानव-वन्यजीव संघर्ष नियंत्रण.
  • नुकसानभरपाई प्रस्ताव तयार करणे.


RFO चा पगार (2025 अंदाजे)
  • ₹56,100-₹1,77,500 (Pay Matrix Level-10)
  • DA, HRA, TA, Forest Allowance वेगळी.
  • सरकारी निवास, वाहन सुविधा (काही ठिकाणी).


प्रमोशन सिस्टीम
  • RFO →
  • ACF (Assistant Conservator of Forests)
  • DCF (Deputy Conservator of Forests)
  • CF (Conservator of Forests)



RFO ची ट्रेनिंग कुठे होते?
  • Central Forest Academy / State Forest Training Institute
  • मैदानी प्रशिक्षण (Field Training) खूप कठीण असते.
  • जंगलात राहून प्रत्यक्ष काम शिकवले जाते.


RFO जॉबमधील धोके
  • नक्षलग्रस्त व दुर्गम भागात पोस्टिंग.
  • वनमाफिया, लाकूड तस्कर यांचा धोका.
  • वन्यप्राण्यांशी प्रत्यक्ष सामना.


RFO आणि ग्रामस्थ
  • वनहक्क कायदा (Forest Rights Act) अंमलबजावणी.
  • गावसभा, आदिवासी समाजाशी समन्वय.
  • वृक्षलागवड योजना राबवणे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या