काम आदेश म्हणजे एखाद्या सरकारी / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (जसे की - ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद) वतीने दिलेला एक लिहित आदेश असतो, ज्यामध्ये ठराविक काम कोणाकडून, कोणत्या अटींवर, किती रकमेसाठी करून घ्यायचं आहे हे नमूद केलेले असते.
या आदेशात हे असतंः
- कामाचं नाव (उदाहरणार्थ- पाण्याच्या टाकीची दुरुस्ती)
- ठेकेदाराचं नाव
- मंजूर रक्कम
- कामाचा कालावधी
- अटी व शर्ती
- निधी कुठल्या योजनेतून आहे (उदा. 15 व्या वित्त आयोगातून)
- काम आदेश मिळाल्याशिवाय कोणतंही काम सुरू करता येत नाही.
काम आदेश मागायचा अधिकार कोणाला आहे?
- ठेकेदार / पुरवठादार / काम करणारा व्यक्ती / संस्था
- ज्याच्याकडून काम करून घेतलं जाणार आहे, त्या व्यक्तीला किंवा संस्थेला काम सुरु करण्यापूर्वी काम आदेश मागायचा पूर्ण अधिकार असतो.
2 ग्रामपंचायत सदस्य / सरपंच / उपसरपंच / नगरसेवक
- ते देखील गावातील कामाबाबत काम आदेशाची कॉपी मागू शकतात कारण काम सार्वजनिक पैशातून होणार असतं आणि लोकांना माहितीचा अधिकार (RTI) आहे.
3 गावकरी / सामान्य नागरिक
- कोणतंही काम सार्वजनिक निधीतून होत असेल तर कोणताही नागरिक RTI द्वारे काम आदेशाची कॉपी मागू शकतो.
काम आदेश कसा मागायचा?
1 ठेकेदार म्हणून
संबधित कार्यालयाकडून (उदा. ग्रामपंचायत / पंचायत समिती) थेट मागू शकतो.
2 सदस्य किंवा नागरिक म्हणून
ग्रामसेवक / सरपंचकडे विनंती करू शकतो.
अधिकृतरित्या RTI द्वारे अर्ज करून मागवू शकतो.
महत्त्व का आहे?
- काम आदेशाशिवाय जर काम सुरू केलं, तर पुढे त्या कामाचे पैसे मिळण्यास अडचण येते.
- भ्रष्टाचार टाळण्यासाठी सार्वजनिक पद्धतीने काम आदेश दिसणं गरजेचं असतं.
- पारदर्शकता येते.
काम आदेशाची महत्त्वाची वैशिष्ट्ये
1 लेखी स्वरूपात असतो
कामाचा तोंडी आदेश ग्राह्य धरला जात नाही.
कोणतीही अधिकृत कागदपत्र मानली जाणारी गोष्ट "काम आदेश" असते.
2 मंजूरीशिवाय काम केलं तर?
जर ठेकेदाराने/कोणत्याही व्यक्तीने काम आदेशाशिवाय काम केलं, तर त्या खर्चाची देयके सरकारकडून मिळत नाहीत.
त्यावर नंतर वितरीत निधी मिळू शकत नाही.
3 कोणत्या परिस्थितीत दिला जातो?
काम मंजूर झाल्यावर (सर्वसाधारणपणे ग्रामसभेचा ठराव / समितीचा ठराव घेतल्यावर).
मंजूर अंदाजपत्रकात (estimate) निधी उपलब्ध असेल.
प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मान्यता मिळाल्यावर.
काम आदेश कुठे ठेवतात?
सरकारी कार्यालयाच्या रेकॉर्डमध्ये.
संबंधित ठेकेदार / पुरवठादारकडे एक प्रत.
लेखापाल / ऑडिटरकडे.
काम आदेश कोण देतो ?
ग्रामपंचायतीमध्ये - ग्रामसेवक व सरपंच यांच्या सहीने.
नगरपालिकेत - मुख्याधिकारी / अभियंता यांच्या सहीने.
पंचायत समितीमध्ये - BDO / गटविकास अधिकारी.
जिल्हा परिषदेमध्ये कार्यकारी अभियंता / CEO यांच्या सहीने.
काम आदेश (Work Order) चा नमुना
कार्यालय : ग्रामपंचायत [गावाचे नाव], तालुका [तालुक्याचे नाव],
जिल्हा [जिल्हा नाव]
दिनांक : [दिनांक]
काम आदेश क्रमांक : GP/[क्रमांक]/2025-26
प्रति,
[ठेकेदाराचे नाव / संस्थेचे नाव]
पत्ताः [पूर्ण पत्ता]
विषयः पाणी पुरवठा योजना अंतर्गत नळ योजना दुरुस्तीचे काम आपणास सूचित करण्यात येते की, खालीलप्रमाणे काम आपल्याकडे मंजूर करण्यात आले आहे:
1 कामाचे नाव : नळ योजना दुरुस्ती
2 मंजूर रक्कम : ₹ 1,25,000/-
3 कामाचा कालावधी : आदेशापासून 30 दिवसांच्या आत पूर्ण करणे
4 निधीचा स्रोत : 15 वा वित्त आयोग (सामान्य निधी)
5 अटी व शर्ती :- काम दर्जेदार करणे
लेखी परवानगी शिवाय अतिरिक्त काम करु नये - पूर्ण झालेल्या कामाचा लेखापरीक्षणासाठी तपशील द्यावा


0 टिप्पण्या