Ticker

50/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

मनरेगा म्हणजे काय?

महाराष्ट्र आणि भारतातील ग्रामीण भागात रोजगार हमी देणारी एक महत्वाची योजना म्हणजे मनरेगा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA). याचा उद्देश गरीब आणि बेरोजगार ग्रामीण कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देणे आहे.
महाराष्ट्र आणि भारतातील ग्रामीण भागात रोजगार हमी देणारी एक महत्वाची योजना म्हणजे मनरेगा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA).
याचा उद्देश गरीब आणि बेरोजगार ग्रामीण कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देणे आहे.


मनरेगा म्हणजे काय?

  • पूर्ण नावः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
  • (MGNREGA)
  • सुरुवातः 2 फेब्रुवारी 2006 रोजी
  • कायद्यानुसारः मनरेगा हा भारत सरकारचा कायदेशीर हक्काचा कार्यक्रम आहे, जो "MGNREGA Act, 2005" अंतर्गत लागू केला जातो.
  • उद्दिष्टः ग्रामीण भागातील कोणत्याही इच्छुक कुटुंबाला दरवर्षी 100 दिवसांचे मजुरीवर आधारित काम हमीने देणे.



कोण पात्र आहे?

  • ज्याचे गावात रहिवासी कार्ड (BPL किंवा सामान्य) आहे.
  • ज्याचे वय 18 वर्षांपक्षा जास्त आहे.
  • ज्यांना शारीरिक काम करण्याची तयारी आहे.
  • नोकरी कार्ड (Job Card) असणे आवश्यक.


Job Card म्हणजे काय ?

  • हा एक सरकारी ओळखपत्र आहे.
  • यात कुटुंबातील काम करू इच्छिणाऱ्या सदस्यांची नावे असतात.
  • नोकरी कार्ड नसल्यास, ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करून मिळवता येतो (निःशुल्क).
  • यावर कामाचे नोंद, हजेरी, मिळालेले वेतन इत्यादी तपशील असतात.


कोणती कामं मनरेगांतर्गत मिळतात ?

1 शेततळ्यांचे खोदकाम
2 नाला बांधणे / दुरुस्ती
3 वृक्षारोपण
4 शेतसिंचनाचे काम
5 रस्ता मुरूमीकरण (कच्चे रस्ते)
6 सांडपाण्याचा निचरा
7 जलसंधारण
8 पाणंद रस्ते
9 कंपोस्ट खड्डे
10 ग्रामपंचायत कार्यालयाची बांधकामे इ.


मजुरी आणि पेमेंट

  1. महाराष्ट्रात सध्या (2024-25) मनरेगाची दरदिवस मजुरी ₹280 ते ₹320 दरम्यान आहे.
  2. पैसे बँक खात्यावर थेट जमा होतात (Direct Benefit Transfer).
  3. काम झाल्यानंतर 15 दिवसांत पेमेंट देणे बंधनकारक आहे.


मनरेगाचे मुख्य अधिकार आणि हमी

  • 15 दिवसांच्या आत काम मिळाले नाही तर बेरोजगारी भत्ता मिळतो.
  • ठराविक दराने कामाचे पैसे.
  • हजेरी, पेमेंट आणि नोंदी खुले ठेवणे.
  • ग्रामसेवक, BDO, जिल्हाधिकारी, लोकशाही दिन, टोल फ्री क्रमांक.

अंमलबजावणी कोण करते ?

  1. ग्रामपंचायत - कामाचे निवड, हजेरी ठेवणे.
  2. ग्रामसेवक/तलाठी - देखरेख.
  3. ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर (BDO) प्रगतीचा आढावा.
  4. जिल्हाधिकारी/CEO ZP - निधी वितरण व नियंत्रण.

मनरेगा बद्दल ऑनलाइन माहिती

वेबसाईट: nrega.nic.in
तुम्ही तुमचे Job Card नंबर टाकून कामाचा तपशील, मिळालेली रक्कम, हजेरी रिपोर्ट, गावाची कामं, बजेट इ. पाहू शकता.


मनरेगामधील गैरप्रकार / समस्या
  • बनावट हजेरी.
  • पैसे वेळेवर न मिळणे.
  • काही "नावे" काम न करता पैसे मिळवतात.
  • ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभारामुळे कामाची निवड चुकीची होते.

मनरेगा अंतर्गत काम कसे सुरू होते ?

  • ग्रामसभेत कामाचा प्रस्ताव ठरतो (उदा. नाला खोदणे).
  • ग्रामपंचायत प्रस्ताव तहसील/BDO कडे पाठवते.
  • काम मंजूर झाले की Job Card धारकांना बोलावले जाते.
  • मजुरी आणि सामग्रीचा अंदाज (Estimate) तयार होतो.
  • काम सुरू - हजेरी, मस्टर रोल, फोटो नोंदी आवश्यक.
  • काम झाल्यावर मोजणी व नोंदींची पडताळणी होते.
  • पैसे DBT द्वारे मजुराच्या खात्यात.


महत्वाचे हेल्पलाईन नंबर
MGNREGA टोल फ्री: 1800-111-555
महाराष्ट्र राज्य स्तर तक्रार अधिकारीः जिल्हा पंचायत / तहसील कार्यालय/EGS मंत्रालय 


मनरेगाशी संबंधित महत्वाचे कायदे आणि नियम

MGNREGA Act, 2005 हा कायदा भारतात प्रथमच ग्रामीण रोजगारावर कायदेशीर हक्क देतो.
1 Section 3 (1): प्रत्येक घराला वर्षाकाठी 100 दिवस मजुरीचे काम देण्याची हमी.
2 Section 6: केंद्र सरकार मजुरीचा दर ठरवते.
3 Schedule I & II: कामाचे स्वरूप, मजुरी आणि मटेरियल रेशो इ. सांगतात.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या